या मार्गदर्शन सत्रास श्रीम. बानू पटेल यांनी या सत्रामध्ये १० वी नंतरच्या विविध शैक्षणिक प्रवाहांची सविस्तर माहिती दिली. विज्ञान शाखेतून वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी व तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी, कॉमर्स शाखेतून वित्त व व्यवस्थापन क्षेत्रातील संधी, तसेच कला शाखेतून स्पर्धा परीक्षा, कायदा व सामाजिक क्षेत्रातील करिअर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर श्री. विवेक गजाबे आणि श्रीम. लक्ष्मी बेरे यांनी संरक्षण दल, पोलीस भरती, UPSC मार्फत IAS/IPS अधिकारी होण्याचा मार्ग, ITI व कौशल्याधारित शिक्षण, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्ससारख्या उदयोन्मुख क्षेत्रांतील संधींची माहिती देण्यात आली. तसेच SMRK College मार्फत देण्यात येणारे कनिष्ठ महाविद्यालय (११वी-१२वी), पदवी अभ्यासक्रम (B.A., B.Com., B.Sc.), व्यावसायिक कोर्सेस, संगणक प्रशिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र याची माहिती दिली.
श्रीम.अश्विनी देवरे यांनी महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेची पात्रता, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. विशेषतः शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी नियमित व्यायाम, धावणे, संतुलित आहार व शिस्तबद्ध दिनचर्या यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस सेवेत करिअर करण्याबाबत उत्साह व आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच श्री. त्रिभुवन यांनी Pratham Education Foundation मार्फत १० वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेस, प्रशिक्षण सुविधा व रोजगार संधींबाबत सादरीकरण करण्यात आले.
मनपा अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी आजच्या बदलत्या व स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षणापुरते मर्यादित न राहता कौशल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृषी, संरक्षण सेवा, प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी, क्षमता आणि ध्येय लक्षात घेऊन योग्य दिशा निवडण्यास सांगितले.
प्रशासन अधिकारी डॉ. मिता चौधरी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून अशा प्रकारचे करिअर मार्गदर्शन उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थ्याने मोठे स्वप्न पाहावे, प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी आणि आपल्या कुटुंबासह शहराचे नाव उज्ज्वल करावे.
सदर करिअर मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता व भविष्यकालीन संधी लक्षात घेऊन योग्य निर्णय घेण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. कोठावदे यांनी तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार श्रीमती प्रिया ठाकूर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्रीम. प्रिया ठाकूर,श्री. प्रभाकर पाडवी, श्रीम. दीक्षा महाजन यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी मनपाच्या १२ माध्यमिक शाळेतील ९५० विद्यार्थ्यी, शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते.





























